मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारने घातली बंदी, UAPA अंतर्गत कारवाई

आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कृत्य केल्यास त्यांना सोडले जाणार नाही आणि कायद्याच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे, असे देखील अमित शाह यांनी ठणकावून सांगितले.
Muslim League Jammu Kashmir
Muslim League Jammu Kashmir

Muslim League Jammu Kashmir

केंद्र सरकारने बुधवारी (२७ डिसेंबर) मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर-मसरत आलम गटावर (एमएलजेके-एमए) बंदी घातली. सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत केली आहे. संघटनेचे सदस्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते आणि दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप या संघटनेवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'मुस्लिम लीग जम्मू काश्मीर' (मसरत आलम गट) MLJK-MA या संघटनेला UAPA अंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संघटना आणि त्याचे सदस्यांचा जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभाग आहे. जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी ते दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना भडकावतात.

Muslim League Jammu Kashmir
Mumbai-Ayodhya Flight : मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा कधीपासून सुरू होणार? 'इंडिगो'ने दिलं उत्तर

आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कृत्य केल्यास त्यांना सोडले जाणार नाही आणि कायद्याच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे, असे देखील अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. (Latest Marathi News)

Muslim League Jammu Kashmir
Mamata Banerjee: येचुरींनंतर ममता बॅनर्जीही जाणार नाहीत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला?; 'हे' आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com