अमरनाथ येथील शिवलिंग मुस्लिम व्यक्तीनेच शोधलं; फारुख अब्दुल्ला यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. फारुख अब्दुल्ला

अमरनाथ येथील शिवलिंग मुस्लिम व्यक्तीनेच शोधलं; फारुख अब्दुल्ला यांचा दावा

श्रीनगर - जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मोठा दावा केला आहे. अब्दुल्ला म्हणाले की, कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने कधीही कोणत्याही धर्माविरुद्ध बोट उचलले नाही. मात्र 90 च्या दशकात तशी लाट आली होती हे त्यांनी मान्य केले. मात्र अमरनाथ गुहेत 'शिवलिंग' असल्याची माहिती सर्वप्रथम देणारी व्यक्ती मुस्लिम होती, असंही ते म्हणाले. (muslim man first seen lingam in amarnath says Abdullah)

हेही वाचा: खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; प्रशासनाचा निर्णय

अब्दुल्ला म्हणाले, "पहलगाममधील एका मुस्लिमाने अमरनाथ गुहेत शिवलिंग पाहिले होते. त्याने ते काश्मिरी पंडितांना कळवले होते. कोणत्याही मुस्लिमाने कधीही कोणत्याही धर्माविरुद्ध बोट उचलले नाही. मात्र 1990 च्या दशकात हिंदुविरोधी एक लाट आली होती हे मान्य करतो, पण ती दुसरी कुठून तरी आली होती, असंही अब्दुल्ला यांनी नमूद केलं.

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालटाल मार्गावर अमरनाथ यात्रा तत्पूरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या 43 दिवसांच्या यात्रेला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममधील नुनवान आणि गंदरबलमधील बालटाल बेस कॅम्प येथून कोणत्याही यात्रेकरूला पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी नाही.

हेही वाचा: 'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरू यांची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

30 जूनपासून सुमारे 71,000 यात्रेकरूंनी पवित्र गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा ११ ऑगस्टला संपणार आहे. दरम्यान, कडक सुरक्षेदरम्यान, दक्षिण काश्मीरमधील 3,880 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी 6,300 हून अधिक भाविकांची सहावी तुकडी मंगळवारी रवाना झाली आहे.

Web Title: Muslim Man First Seen Lingam In Amarnath Says Farooq Abdullah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..