'जय श्रीराम'वरून मारहाण झालेल्या मुस्लिम युवकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

तरबेझचे नातेवाईक मकसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्याच्यावर चोरीचा आरोप होता, पण मुस्लिम असल्याने त्याला जातीय रंग देण्यात आला. त्याला सतत जय श्रीराम आणि जय हनुमान घोषणा द्यायला लावल्या. या प्रकरणी सर्व दोषींना तात्काळ अटक झाली पाहिजे. 

रांची : चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या मुस्लिम युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शम्स तरबेज अन्सारी असे या युवकाचे नाव असून, त्याला बळजबरी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील सिरीईकेला खर्सवान जिल्ह्यातील धतकिडीह गावात गेल्या मंगळवारी ही घटना घडली होती. दुचाकी चोरल्याच्या संशयावरून त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. त्याला एका पोलला बांधून सुमारे सात तास जमावाकडून मारहाण करण्यात येत होती. तसेच त्याला जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा द्यायला सांगण्यात येत होत्या. बुधवारी सकाळी अखेर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. अखेर रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तरबेझचे नातेवाईक मकसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्याच्यावर चोरीचा आरोप होता, पण मुस्लिम असल्याने त्याला जातीय रंग देण्यात आला. त्याला सतत जय श्रीराम आणि जय हनुमान घोषणा द्यायला लावल्या. या प्रकरणी सर्व दोषींना तात्काळ अटक झाली पाहिजे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim man thrashed by mob on suspicion of theft forced to chant Jai Shree Ram dies