मुस्लिम बांधवांचा आदर्श; पुलाच्या कामासाठी मशीद पाडण्यास परवानगी 

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

श्रीनगरमधील चाळीस वर्षे जुनी मशीद पाडण्यास मुस्लिम धर्मीयांनी परवानगी दिल्याने पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेले झेलम नदीवरील पुलाचे काम अखेर मार्गी लागले.

श्रीनगर : श्रीनगरमधील चाळीस वर्षे जुनी मशीद पाडण्यास मुस्लिम धर्मीयांनी परवानगी दिल्याने पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडलेले झेलम नदीवरील पुलाचे काम अखेर मार्गी लागले. विकासकामाच्या मार्गात येणारी मशीद पाडण्यास परवानगी देत मुस्लिम समुदायाने अनोखा आदर्श घालून दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

24 तासांत कामाला सुरुवात
झेलम नदीवर बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे काम 2002 पासून रखडले होते. एक मशीद आणि काही रहिवासी व व्यावसायिक बांधकामांमुळे या पुलासाठीच्या जमिनीच्या भूसंपादनामध्ये अडचणी येत होत्या. हा तिढा सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. श्रीनगरचे जिल्हा विकास आयुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी मशिदीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून हा तिढा सोडवला. त्यानंतर सरकार आणि मशीद व्यवस्थापनात याबाबतचा करार झाला. या करारानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे चौधरी यांचे कौतुक होत आहे.  चौधरी यांनी यापूर्वीही दुसऱ्या एका महत्त्वाच्या विकास प्रकल्पातील तिढा चर्चेच्या माध्यमातून सोडविला होता. श्रीनगरमधील एतिहासिक दमदमा साहेब गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाबरोबर यशस्वी चर्चा करून चौधरी यांनी श्रीनगर ते बारामुला राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू केले होते, असे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हैदराबाद प्रकरण : पोस्टमॉर्टमसाठी 'एम्स'नं डॉक्‍टरांना पाठवलं हैदराबादला!

"12 महिन्यांत मशीद बांधून देणार' 
चौधरी यांनी डिसेंबरच्या सुरुवातीपासून मशिदीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चेसाठी बैठका घेतल्या. त्यातून भूसंपादनाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात ते यशस्वी झाले. श्रीनगरमधील कमारवारी आणि नूरबाग या भागांना जोडणारा हा पूल आहे. सरकार आणि मशिदीच्या व्यवस्थापनामध्ये झालेल्या करारानुसार संबंधित मशिदी 12 महिन्यांमध्ये पुन्हा बांधून देण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांचा आदर्श; पुलाच्या कामासाठी मशीद पाडण्यास परवानगी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslims agree to demolition a mosque for long-awaited bridge on Jhelum