मुस्लिमांना असतात 50 बायका अन् 1050 मुले : भाजप आमदार

Surendra Singh
Surendra Singh

लखनौ : देशातील मुस्लिम नागरिकांच्या वाढत्या संख्येवर आक्षेपार्ह वक्तव्य करताना भाजप आमदाराने म्हटले आहे, की मुस्लिम व्यक्तीला 50 बायका आणि 1050 मुले असतात. 

उत्तर प्रदेशातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी वक्तव्ये केली आहेत. आता त्यांनी मुस्लिम कुटुंबात असलेल्या अधिक अपत्यांबाबत वक्तव्य केले आहे.

सुरेंद्र सिंह म्हणाले, की मुस्लिम धर्मात आपल्याला माहिती आहे की एका व्यक्तिला 50 बायका आणि 1050 मुले असतात. त्यांच्याकडील ही परंपरा नसून, ही पाशवी वृत्ती आहे. आज देशात लोकसंख्या हा मोठा प्रश्न असताना, मुस्लिम समाजाने भान राखले पाहिजे. 

अखिलेश यादव, मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सुरेंद्र सिंह म्हणाले, की अखिलेश आणि मायावती यांना राजकीय दारिद्र्य आले आहे. पश्चिम बंगालमध्ये लंकेचे दहन होणार असून, विभीषणाचे येथे राज्य येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com