
मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज मुत्थूट (MG George Muthoot) यांचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. एमजी जॉर्ज शनिवारी रात्री जवळपास 9 वाजता आपल्या घराच्या छतावरुन पडले आहेत.
नवी दिल्ली- मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज मुत्थूट (MG George Muthoot) यांचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. एमजी जॉर्ज शनिवारी रात्री जवळपास 9 वाजता आपल्या घराच्या छतावरुन पडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते आजारीही होते. ते दिल्लीच्या इस्ट ऑफ कैलाशमध्ये राहायचे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा अपघाती मृत्यू आहे की आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तपास सुरु आहे. शनिवारी रात्री मुत्थूट ग्रुपचे चेअरमन एमजी जॉर्ज मुत्थूट यांचे निधन झाल्याची बातमी आली होती. पण त्यांचा मृत्यू घराच्या चौथ्या मजल्यावरुन पडू झाल्याचे कळत आहे.
मुत्थूट फायनेन्स देशातील सर्वात मोठी गोल्ड लोन बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBCFC) आहे. याचा अर्थ मुत्थूट भारतातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनेन्सिंग कंपनी आहे. एमजी जॉर्ज मुत्थूट आपल्या परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे सदस्य आहेत. त्यांनी मुत्थूट ग्रुपचे चेअरमन पद सांभाळले होते. ते Orthodox Church चर्चचे ट्रस्टीही होती. तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चँबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. याशिवाय ते फिक्की केरळ राज्य परिषदचे अध्यक्षही होते.
नक्षलवादी ते रिक्षा ड्रायव्हर; संघर्षमय आयुष्याने थक्क करणाऱ्याला दिलंय TMC ने...
विशेष म्हणजे एमजी जॉर्ज मुत्थूट यांनी मागील वर्षी फोर्ब्स मॅगझीनच्या श्रीमंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये जागा मिळवली होती. जॉर्ज मुत्थूट यांच्या नेतृत्त्वात कंपनीने जगभरात 5 हजार पेक्षा अधिक शाखा आणि 20 पेक्षा अधिक वेगळ्यावेगळ्या व्यवसायांचा विस्तार केला होता.