पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शहाबुद्दीनवर आरोपपत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी आरोपपत्र दाखल केले.

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी आरोपपत्र दाखल केले.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी सुनीलसिंह रावत आणि सरकारी वकील दीप नारायण यांनी "सीबीआय' न्यायाधीश अनुपम कुमारी यांच्या विशेष न्यायालयात शहाबुद्दीन याच्यासह सहा जणांविरोधात आज आरोपपत्र दाखल केले. शहाबुद्दीन हा सिवान लोकसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आला आहे. अन्य आरोपींची नावे अझहरुद्दीन बेग ऊर्फ लड्डन मियॉं, ऋषीकुमार जैसवाल, रोहितकुमार सोनी, विजयकुमार गुप्ता, रणजित कुमार आणि सोनूकुमार गुप्ता अशी असल्याचे बचाव पक्षाचे वकील शरद सिन्हा यांनी सांगितले. यातील एकावर डिसेंबर 2016 मध्ये "सीबीआय'ने आरोपपत्र दाखल केले असल्याने आज पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर आरोपपत्रे दाखल झाली आहेत.

सिवानमधीाल हिंदी भाषेतील प्रमुख वृत्तपत्रात काम करणारे पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येसह 45 गुन्ह्यांमध्ये सहभागाबद्दल शहाबुद्दीन यांच्यावर खटले सुरू आहेत. सिवानमधील रहिवासी चंद्रकेश्‍वर प्रसाद यांच्या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहाबुद्दीनला फेब्रुवारी महिन्यात तिहार तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. प्रसाद यांची तीन मुले दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडली होती.

Web Title: muzaffarpur news journalist murder case and shahabuddin