esakal | Bihar Election - माझी शेवटची निवडणूक; मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रचारावेळी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे, अंत भला तो सब भला... असं म्हणत नितीश कुमारांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन केलं आहे.

Bihar Election - माझी शेवटची निवडणूक; मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रचारावेळी घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून बिहारमधील सर्व राजकीय पक्षांचे भवितव्य आता इव्हीएमध्ये कैद होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून तर झालाच मात्र, एनडीएतील घटकपक्ष असलेल्या लोजपानेही त्यांना विरोध करतच ही निवडणूक लढवली आहे. आणि आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं आहे.

हेही वाचा - Bihar Election : ...तर नितीशकुमार उद्या तेजस्वींसमोरही नतमस्तक होतील, चिराग पासवान यांचा टोला

नितीश कुमार म्हणाले की,  लक्षात घ्या.... आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट दिवस आहे... आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे, अंत भला तो सब भला... असं म्हणत नितीश कुमारांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन केलं आहे. पुर्णीयामधील प्रचारसभेत ते भाषण करत होते. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. नितीश कुमारांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

इतकंच नव्हे तर बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकीला दोन दिवस उरले असताना संयुक्त लोकशाही आघाडीतील (एनडीए) दोन पक्षांमधील बेबनाव सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) उघड झाला. भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या ‘घुसखोरांना देशाबाहेर हाकलले पाहिजे’, या वक्तव्याचा समाचार घेत ‘कोणामध्‍येही एवढी हिंमत नाही की, तो आमच्या लोकांना देशाबाहेर काढू शकले, असा घणाघात त्यांनी केला.


किशनगंज येथे गुरुवारी प्रचार सभेत बोलताना नितीश कुमार यांनी योगींना लक्ष्य केले. भाषणातील काही अंशाचे व्हिडिओ चित्रण त्यांनी पोस्ट केले आहे. ‘‘हा अपप्रचार कोण करीत आहे. अशा फालतू गोष्टी कोण बोलत आहे. कोण कोणाला देशाबाहेर काढील? या देशात कोणाचीही हिंमत नाही आमच्या माणसांना, सर्वजण हिंदुस्तानचे आहेत, भारताचे आहेत, त्यांना कोण हुसकावून लावणार आहे. तुम्ही संधी दिल्याने आम्ही समाजात एकोपा, प्रेम, सद्‍भावनेचे वातावरण तयार केले आहे. सर्वांचा एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. समाजात भांडणे लावून देण्याचा काहींचा हेतू असतो. काही काम करण्याची गरज नसल्याचे त्यांना वाटते.

हेही वाचा -  व्याजावर व्याजापासून अखेर सुटका; बँकांनी पैसे खात्यात टाकायला केली सुरवात
आम्ही तर काम करीत आलो आहोत. सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले तर समाज, लोक पुढे जातील, त्यांची प्रगती होईल,’’ असे कुमार यांनी म्हटले आहे. कटिहार विधानसभा मतदारसंघातील उमेदवाऱ्याच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी ‘‘जर कोणी घुसखोर भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करीत असेल तर सरकार त्याला देशाबाहेर हाकलून लावेल,’’ असे वक्तव्य केले आहे.

‘सर्वांना बरोबर घेऊन जाणे हाच धर्म’
किशनगंज भागात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. तेथील प्रचारसभेत नितीश कुमार यांनी अल्पसंख्याकांच्‍या कल्याणासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख भाषणात केला. ‘सीएए’च्या संदर्भात ते म्हणाले की, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे हा आपला धर्म आहे. हीच आपली संस्कृती आहे. सर्वांनी एकत्र आले तर बिहार पुढे जाईल, असा विश्‍वास ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.