ती पुरुष आहे! पत्नीने पतीची फसवणूक केल्याबद्दल याचिका दाखल

या प्रकरणी न्यायालयाने पत्नी, तिचे वडील आणि मध्य प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
Supreme Court
Supreme Courtटिम ई सकाळ

एका पतीने त्याच्या पत्नीविरोधात फसवणुक केल्याची याचिका सुप्रीम कोर्टात केली आहे. ती महिला नसून पुरुष असल्याचा दावा पतीने केलाय. पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असून तिने आमची फसवणूक केली असून याप्रकरणी तिच्यावर खटला चालवावा, अशी मागणी या याचिकेतून पतीने केली आहे. विशेष म्हणजे या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सहमती दर्शवली आहे.

सुरवातीला सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. परंतु आता खटला दाखल केलेल्या पतीने मेडिकल रिपोर्ट सादर केल्याने खटल्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने सहमती दिली आहे.

Supreme Court
औषध कंपन्या-डॉक्टरांच्या संगनमताने बेकायदेशीर मार्केटिंग सुरु; SC ने सरकारला बजावली नोटीस

या प्रकरणी याचिकाकर्त्याची बाजू मांडताना वरिष्ठ वकील एनके मोदी युक्तीवाद केला की ही निश्चितच फसवणूक आहे. मेडिकल रिपोर्टनुसार हा काही जन्मजात आजार नसून तिला तिच्या गुप्तांगाबद्दल माहिती होते. पण तिने जाणीवपुर्वक फसवणूक केल्याचे वरिष्ठ वकील मोदी म्हणाले. एफआयआरवर योग्य ती कारवाई व्हावी आणि पत्नीने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल कायद्याने तीला शिक्षा व्हावी, अशी मागणी याचिकाकर्ता पतीचे असल्याचे वरिष्ठ वकील मोदी यांनी खंडपिठासमोर सांगितले.

या प्रकरणी न्यायालयाने पत्नी, तिचे वडील आणि मध्य प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर मागवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com