

Man Protests VIP Road Block With Pregnant Wife in Car
Esakal
बंगळुरूत राज्यपालांच्या ताफ्यामुळे काही काळ वाहतूक रस्ता बंद केल्यानं गर्भवती पत्नीसह वाहतूक कोंडीत अडकलेल्या पतीने थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. व्हीआयपी ताफ्यामुळे लावलेल्या निर्बंधामुळे ट्राफइकमध्ये अडकल्याचा आरोप पतीने केला. राज्यपालांच्या ताफ्यावेळी घडलेल्या या घटनेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बंगळुरू ओल्ड एअर पोर्ट परिसरात जवळपास ३० मिनिटे वाहतूक थांबली होती. आधीच या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यातच अचानक वाहतूक थांबवल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात ऑफिसला जाणारे, सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णवाहिकासुद्धा अडकून पडली होती. Bengaluru Traffic Chaos During Governor Convoy Movement