Mysore Dasara History
esakal
दसऱ्याची परंपरा विजयनगर साम्राज्यातून सुरू झाली आणि शाही वैभव दाखवण्यासाठी केली जात होती.
वाडियार राजवटीत दसऱ्याला राज्य उत्सव म्हणून पुनरुज्जीवन मिळाले आणि श्रीरंगपट्टण येथे भव्य मिरवणूक भरवली गेली.
आजचा दसरा नाड हब्ब म्हणून साजरा होतो, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आणि पर्यटकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.
Mysore Dasara History : दसरा हा भारतातील सर्वात वैभवशाली उत्सव मानला जातो. विशेषतः म्हैसूरच्या राजवाड्यात होणाऱ्या या उत्सवाला ऐतिहासिक (Royal Festival Mysore) परंपरेचा ठसा आहे. पूर्वी राज्यकर्त्यांनी दसरा साजरा केला असला तरी, विजयनगर साम्राज्याच्या राजांनी या सणाला ठोस आणि भव्य स्वरूप दिलं. अनेक परदेशी प्रवासी व व्यापाऱ्यांनी त्यांच्या लेखनात या उत्सवाचं तपशीलवार वर्णन केलं आहे.