Mysore Sandal financial growth story
esakal
बंगळूर : ११० वर्षांची परंपरा असलेल्या राज्य सरकारच्या मालकीच्या ‘म्हैसूर सँडल’ तथा कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडने (केएसडीएल) २०२५-२६ या आर्थिक वर्षात (Mysore Sandal record turnover 2025) प्रथमच २,०१६ कोटींची विक्रमी उलाढाल करत ५०७ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. हा संस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी मंगळवारी सांगितले.