पुलवामा येथील शाळेत स्फोट; 12 विद्यार्थी जखमी

पुलवामा येथील शाळेत स्फोट; 12 विद्यार्थी जखमी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत स्फोट झाला. शाळेत झालेल्या या स्फोटात 12 विद्यार्थी जखमी झाले असून, 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुलवामा येथे झालेल्या या स्फोटात 12 विद्यार्थी जखमी झाले तर 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण शाळा रिकामी केली. शाळेत जेव्हा हा स्फोट झाला. तेव्हा विद्यार्थ्यांचे अतिरिक्त क्लालेस सुरु होते. शाळेच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीने ग्रेनेडच्या माध्यमातून हल्ला केला.

दरम्यान, शाळेत झालेल्या या स्फोटात दहावीत शिक्षण घेणारे विद्यार्थी जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com