
VIDEO : आंध्रात समुद्राच्या लाटांमध्ये वाहत आला 'सोन्याचा रथ'
श्रीकाकुलम : आंध्र प्रदेशात ‘असनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील काकीनाडा येथे असनी चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. या सर्वामध्ये राज्यातील श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे सोन्याचा रंग असलेला रथ समुद्रांच्या लांटांमधून वाहत आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा रथ पाहण्यासाठी नोगरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा थर असलेला एक सुंदर रथ समुद्राच्या लाटांमध्ये वाहत आला. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने व्हिडिओ ट्वीट केला आहे.
आढळून आलेल्या रथाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्हिडिओममध्ये काही नागरिक रथ दोरीच्या सहाय्याने किनाऱ्यावर ओढत आणत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली असल्याचे श्रीकाकुलम जिल्ह्यातील नौपाडाच्या उपनिरीक्षकाने सांगितले आहे. तसेच हा रथ दुसऱ्या एखाद्या देशातूनही वाहून आलेला असू शकतो अशी शक्यता एसआयने बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा: केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू' चे थैमान, 80 हून अधिक मुले पीडित; जाणून घ्या लक्षणे
रथ नेमका कसा?
श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे आढळून आलेला सोन्याचा रंगाच्या रथाचा आकार आग्नेय आशियाई देशांतील मठांसारखा असून, असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत हा रथ येथे पोहोचला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
असनी चक्रीवादळ कमकुवत
दरम्यान, हवामान विभागाने तीव्र चक्रीवादळ असनी पूर्वीच्या तुलनेत बुधवारी किंचित कमकुवत झाले असून, ते उत्तर कोस्टल आंध्र प्रदेशकडे सरकले असल्याचे म्हटले आहे. तसेच हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर जाण्याची आणि गुरुवारपर्यंत अधिक कमकुवत होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
Web Title: Mysterious Gold Coloured Chariot Spotted At Sunnapalli Coast In Srikakulam Of Andhra Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..