mamata banerjee
sakal
कोलकता - ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित एक पेन ड्राइव्ह माझ्याकडे आहे. राज्यातील कोळसा गैरव्यवहारातील पैसे हे केंद्रातील भाजपच्या नेत्यांपर्यंत पोचत होते. माझ्याकडे याचे पुरावेदेखील आहेत. गरज भासल्यास आम्ही ते जनतेसमोर सादर करू,’ असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथील निषेध सभेमध्ये बोलताना दिला.