...अन् संसदेत अवतरला 'हिटलर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली की दुसऱ्या महायुद्धातील संहार आणि ज्यू नागरिकांवर केलेले अत्याचार समोर येतात. परंतु, भारतीय संसदेत हिटलर पाहून सर्वांनाच आज (गुरुवार) धक्का बसला. पण हा कुणी खराखुरा हिटलर नव्हता तर ते होते तेलुगू देसमचे खासदार एन. शिवकुमार.

एन. शिवकुमार हे हिटलरचा वेश परिधान करून संसदेत आले. हिटलरचा वेश परिधान करून प्रवेश केलेल्या एन. शिवकुमार यांच्याकडे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तेलुगू देसम पक्ष आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करण्यासाठी व या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एन. शिवकुमार हे असा वेश धारण करून संसदेत आले होते.

शिवकुमार हे आंध्र प्रदेशची ओळख असलेली पारंपरिक साडी परिधान करून संसदेत यापूर्वी आले होते. विद्यार्थी, नारद मुनी अशा वेशभूषा करूनहीय त्यांनी सातत्याने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ते नारद मुनी, तांत्रिक आणि महिलेची वेशभूषा करून ते संसदेत आले होते. काळा पैशाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ते अर्धा पांढरा व अर्धा काळे शर्ट परिधान करून संसदेत आले होते. एन. शिवप्रसाद हे राजकारणात उतरण्यापूर्वी अभिनय क्षेत्रात होते.

Web Title: N Shivakumar wearing hitler dress and came indian parliament