एन. टी. रामाराव यांचे चरित्र  प्रकाशनापूर्वीच वादात 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

हैदराबाद- "तेलुगू देसम'चे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारित प्रस्तावित चरित्रात्मक ग्रंथावरून प्रकाशनापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेते आणि आमदार असलेले रामाराव यांचे सुपुत्र नंदामुरी बालकृष्णन यांनी हा ग्रंथ लिहिला असून, यामध्ये अनेक सनसनाटी गौप्यस्फोटांचा समावेश आहे. एन. टी. रामाराव यांच्या द्वितीय पत्नी लक्ष्मी पार्वती यांनी यास आक्षेप घेतला असून, प्रसंगी याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

सध्या या ग्रंथांसाठीचे संशोधन सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा बालकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. बालकृष्णन यांनी या ग्रंथामध्ये राजकीय तथ्यांचा विपर्यास केल्यास आपण त्यांना थेट न्यायालयामध्येच आव्हान देऊ, असे लक्ष्मी पार्वती यांनी सांगितले. एन. टी. रामाराव यांचे जावई आणि विद्यमान मुख्यमंत्री नरा चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. या आत्मचरित्रामध्ये चंद्राबाबू यांचे नायक म्हणून केलेले सादरीकरण आपण खपवून घेणार नाही. या ग्रंथाच्या माध्यमातून चंद्राबाबू यांनी रामाराव यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यासाठी कशा पद्धतीने कारस्थान रचले होते? हेदेखील उघड केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान "तेलुगू देसम'च्या काही नेत्यांनी मात्र या पुस्तकातून लक्ष्मी पार्वती यांना खलनायिका म्हणूनच सादर केले जाणार असल्याचे सांगितले. 
 
Web Title: N. T. Rao's biography in controversy