प. बंगाल : अल्पवयीन मुलीच्या बलात्कार-हत्या प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nadia rape murder case cbi arrest first accuse total arresting is three

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार-हत्या प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) ने शनिवारी पहिली अटक केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी रामजीत मलिक याला तपास यंत्रणेने अटक केली आहे. सीबीआयने रामजीत मलिकला नादिया जिल्ह्यातील रंगघाट भागातून अटक केली आहे. दरम्यान यापूर्वी, बंगाल पोलिसांनी टीएमसी नेत्याच्या मुलासह दोन आरोपींना अटक केली होती.

या प्रकरणात टिएमसी नेत्याच्या नाव पुढे आल्यानंतर बंगालच्या राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, सीबीआयने हे प्रकरण निष्पक्ष तपासासाठी हाती घ्यावे आणि पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये आणि परिसरातील आणि राज्यातील रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण करावा. न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना आणि या खटल्यातील साक्षीदारांना पूर्ण संरक्षण देण्यास सांगितले होते.

काय प्रकरण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती, जिथे तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तीचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिक टीएमसी पंचायत नेत्याच्या दबावाखाली शवविच्छेदन आणि मृत्यू प्रमाणपत्राशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला होता. नेत्याचा मुलगा ब्रज गोपाल गोला (21) हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. या घटनेच्या पाच दिवसांनी 10 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा: दारू पिऊन गुरुद्वारेत प्रवेश; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

मुलीच्या वडिलांनी सांगितले होते की, "4 एप्रिल रोजी समर गोला यांच्या मुलाच्या निमंत्रणावरून माझी मुलगी वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. त्यांनी माझ्या मुलीला संध्याकाळी साडेसात वाजता सोडले. त्यावेळी घरी असलेल्या माझ्या पत्नीने मला सांगितले की. तिला सोडण्यासाठी एक महिला आणि दोन पुरुष आले होते. ते कोण होते ते आम्हाला माहीत नाही. त्या पार्टीतून परतल्यावर तिला रक्तस्त्राव होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने आम्ही डॉक्टरांना भेटायला गेलो. आम्ही परत येईपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. समर गोलाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला होता."

त्यांनी पुढे सांगितले की, "त्या दिवशी संध्याकाळी माझ्या मुलीला सोडण्यासाठी आलेल्यांनी तोंड उघडले तर आमच्या घराला आग लावू, अशी धमकी दिली. त्यामुळेच आम्ही कोणाला काही बोललो नाही. पण आता मी आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहे."

हेही वाचा: काँग्रेसची प्रशांत किशोर यांना 'ऑफर', 2024 साठी मास्टर प्लानही देणार

Web Title: Nadia Rape Murder Case Cbi Arrest First Accuse Total Arresting Is Three

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West BengalTMC