esakal | देशात फक्त दोन हजार टन खसखस शिल्लक; १,४०० रुपये किलोच्या भावाने विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur news Only two thousand tons of poppy left in the country

केंद्र सरकार खसखस आयातीची परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात खसखशीचा तुटवडा आहे. त्यामुळे खसखशीचे दर तेजीत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता पटेल यांनी व्यक्त केली आहे.

देशात फक्त दोन हजार टन खसखस शिल्लक; १,४०० रुपये किलोच्या भावाने विक्री

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढविणाऱ्या खसखशीचे उत्पादन घटले आहे. देशात आता फक्त दोन हजार टन खसखस शिल्लक आहे. यामुळे खसखस महाग होत असल्याचे चित्र आहे.

भारतात मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेशात खसखशीची लागवड केली जाते. खसखशीची लागवड करण्यासाठी केंद्र सरकारच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची परवानगी घ्यावी लागते. नवीन खसखशीची आवक पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात दोन ते अडीच हजार टन खसखशीचे उत्पादन होण्याचे संकेत आहेत.

अधिक माहितीसाठी - लग्नाला यायचं बरं का! असं म्हणत दिलं लग्नाचं 'ओलं' निमंत्रण; पत्रिका बघून भलभल्यांना बसला धक्का

तुर्कीत जुलै, ऑगस्ट महिन्यात पांढऱ्या खसखशीचे १८ हजार टन उत्पादन झाले आहे. चेक रिपब्लिकमध्ये पाचशे टन, चीनमध्ये तीन हजार टन उत्पादन आले आहे. भारतात साधारणपणे दरवर्षी वीस हजार टन खसखशीची विक्री होते. देशात गेल्या वर्षी आयात केलेल्या खसखशीचा साठा कमी असून, देशात दोन हजार टन खसखस उपलब्ध आहे.

केंद्र सरकार खसखस आयातीची परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात खसखशीचा तुटवडा आहे. त्यामुळे खसखशीचे दर तेजीत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता पटेल यांनी व्यक्त केली आहे.

सध्या बाजारात एक किलो खसखशीची विक्री १,२५० ते १,४०० रुपये दराने केली जात आहे. खसखशीचा वापर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेत्यांकडून केला जातो.

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

दर तेजीत

भारतात पांढऱ्या खसखशीला मोठी मागणी असते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात निळी खसखस वापरली जाते. बर्गर तसेच पावासाठी या खसखशीचा वापर केला जातो. पिवळ्या खसखशीचा वापर तुर्कीत क्रिम तयार करण्यासाठी केला जातो. देशाअंतर्गत खसखशीची आवक सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार खसखस आयातीला परवानगी देईल, तोपर्यंत दर तेजीत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image