Loksabha 2019 : 'कमल'पुत्राची कोट्यवधींची उड्डाणे; 660.01 कोटींची मालमत्ता 

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

नकुल यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी 660.01 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येच या सांपत्तिक स्थितीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. नकुलनाथ हे उद्योगपती कम राजकारणी असून, त्यांची पत्नी प्रिया यांच्या नावे 2 कोटी 30 लाख रुपयांची ठेव आहे.

छिंदवाडा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल यांनी मंगळवारी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.

नकुल यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी 660.01 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येच या सांपत्तिक स्थितीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. नकुलनाथ हे उद्योगपती कम राजकारणी असून, त्यांची पत्नी प्रिया यांच्या नावे 2 कोटी 30 लाख रुपयांची ठेव आहे. नकुल यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत 41.77 कोटी रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे एवढी संपत्ती असतानाही नकुल आणि प्रिया नाथ यांच्याकडे मात्र एकही वाहन नाही. 

संपत्ती 
896.669 ग्रॅम 
सोन्याची बिस्किटे 
........ 
7.630 कि.ग्रॅम 
चांदी 
....... 
147.58 कॅरटचे हिरे 
...... 
78.45 लाख किमतीचे 
मौल्यवान दागिने 

Web Title: Nakulnath is richer than Kamalnath property details in election commission affidavit