
नवी दिल्ली : ‘‘सर्वांना, अंतराळातून नमस्कार. माझ्या सहकारी अंतराळवीरांबरोबर येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. वा! काय प्रवास होता. प्रक्षेपण केंद्रावर मी कुपीत बसलो होतो तेव्हा माझ्या मनात एक विचार होता तो म्हणजे ‘चला आता जाऊ या!,’’ असे सांगत ‘ॲक्झिओम -४’ मोहिमेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी अंतराळातील अनुभव सांगितले.