'श्वेता'च्या मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ; जाणून घ्या यामागचं भन्नाट कारण

टीम ई-सकाळ
Thursday, 18 February 2021

एक घटना गुरुवारी दुपारनंतर ट्विटरवर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आला, तो म्हणजे 'श्वेता' या नावानं ट्विटरवर अक्षरशः धुमाकूळ घातला.

एखादा ताजा विषय ट्रेंडिंगमध्ये येणं हा ट्विटरसाठी आणि त्याच्या युजर्ससाठी अक्षरशः श्वास समजला जातो. अशीच एक घटना गुरुवारी दुपारनंतर ट्विटरवर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आली, म्हणजेच 'श्वेता' या नावानं ट्विटरवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या नावानं ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर मजेशीर मिम्सचा पाऊस पडल्याने सर्वत्र तिचीच चर्चा होती. पण ही श्वेता नक्की कोण आहे आणि ती ट्रेडिंगमध्ये का आली जाणून घ्या.

नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला 'त्या' दहशतवाद्याची पुन्हा धमकी
 

'श्वेता' नावानं हॅशटॅग ट्रेन्ड झाल्यानं आम्ही उत्सुकतेपोटी त्यावर क्लिक करुन पाहिलं तर त्यात एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याचं दिसून आलं. या ऑडिओ क्लीपमुळेच या श्वेताला ट्विटरवर अल्पावधीच प्रसिद्धी मिळाली. ही बातमी तयार होईपर्यंत श्वेता हे नाव ट्विटरवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंडिंगमध्ये होतं. या नावाने तब्बल 11 हजार ट्विट्स करण्यात आले होते. 

या ऑडिओ क्लीपनुसार, एक ऑनलाइन क्लास सुरु असताना श्वेता आपल्या जवळच्या मित्रासोबत झालेला संवाद आपल्या मैत्रिणीला शेअर करत असते. हा संवाद या ऑनलाइन क्लासमधील प्रत्येकासाठी आश्चर्यकारक ठरला होता. यामध्ये श्वेता आपला माईक म्युट करण्याऐवजी स्पिकर म्युट करते, त्यामुळे मात्र तिच्या मित्राचं सिक्रेट संपूर्ण वर्गाला कळतं. 

 

जगातील पहिली फ्लाईंग कार उड्डाणासाठी सज्ज; अमेरिकेत FAA नं दिली परवानगी
 

श्वेता आपल्या मैत्रिणीला सांगत असते की, तिचा मित्र कशा पद्धतीने त्याचे सगळे सिक्रेट्स तिच्यासोबत शेअर करत असतो. जेव्हा जेव्हा तिचा मित्र त्याच्या सेक्स अॅडिक्ट मैत्रिणीला भेटतो तेव्हा तेव्हा तेव्हा ते मजा करतात. त्यांनी अनेकदा अशी मजा केली आहे. आपला मित्र त्याच्या मैत्रिणीबाबत कधीकधी खूपच भावनिक होतो असंही श्वेता आपल्या मैत्रिणीला सांगत असते. तो त्याच्या मैत्रिणीवर वेड्यासारखं प्रेम करतो. मात्र, ही मुलगी त्याला केवळ वापरुन घेते आणि त्याला याची खबरंही नाही असंही तो आपल्याला सांगत असल्याचं श्वेता आपल्या मैत्रिणीला सांगत असते. 

पतीच्या मालकीच्या जमिनीवर आता पत्नीचेही लागणार नाव; 'या' राज्यानं काढला अध्यादेश
 

दरम्यान, हा संवाद सुरु असताना ऑनलाईन क्लामधील श्वेताचे मित्र तिला सांगत होते की, श्वेता तुझा माइक सुरु आहे. श्वेता...श्वेता तू आता काळजी करु नकोस 111 लोकांना तुझं सिक्रेट माहिती झालं आहे. तरीही श्वेताला ते ऐकू जात नव्हतं. कारण श्वेताच्या फोनचा स्पिकर म्युट असल्याने तिला इतर मित्रांनी वारंवार सांगूनही तिला ऐकू आलं नाही.

त्यानंतर काही वेळातच श्वेता आणि तिच्या मैत्रिणीच्या संवादाची ही ऑडिओ क्लीप ट्विटरवर व्हायरल झाली आणि त्यानंतर नेटिझन्सनी श्वेताच्या या संभाषणावरुन नाविन्यपूर्ण आणि मजेशीर असे मिम्स पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर काही तासांतच श्वेता या हॅशटॅगनं ट्विटरवर मिम्सचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यानंतर श्वेता ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये यायला सुरुवात झाली.

 

भारत, देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the name of Shweta hilarious memes trending on twitter Find out the reason behind it

Tags
टॉपिकस
Topic Tags: