nana patekar digital arrest up police
sakal
Nana Patekar Digital Arrest Story: सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक करत असतानाच, उत्तर प्रदेश पोलिसांनी एका अनोख्या कल्पनेतून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिकेतील एका लघुपटाद्वारे पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन फसवणुकीपासून कसे वाचावे, याचे धडे दिले आहेत. या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात नाना पाटेकर चक्क सायबर गुन्हेगाराकडूनच ६० हजार रुपये वसूल करताना दाखवण्यात आले आहेत.