कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

Nandini Bosmiya Death Case: नगरपालिका निवडणूक लढलेल्या नंदिनी बोसमिया राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. २३ वर्षीय नंदिनीच्या कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.
Nandini Bosmiya Death Case

Who is Nandini Bosmiya? AAP Candidate Found Dead at Home

Esakal

Updated on

Nandini Bosmiya Case: गुजरातच्या राजकोट इथं आम आदमी पार्टीकडून नगरपालिका निवडणूक लढलेल्या नंदिनी बोसमिया राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. २३ वर्षीय नंदिनीच्या कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. जेतपूर नवागढ नगरपालिका निवडणुकीत ती आम आदमी पार्टीची उमेदवार होती. राजकोटच्या वावडी परिसरात घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com