नारायणसाईविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

नोएडा - वादग्रस्त गुरू आसारामबापू यांचा मुलगा नारायणसाई याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आणखी एका महिलेने पोलिसांकडे केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दिनेश यादव यांनी सांगितले. पीडित महिला ही 2013 मध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीत कामाला होती. त्या वेळी नवी दिल्लीतील करोलबाग परिसरातील नारायणसाईच्या आश्रमात त्याची मुलाखत घेण्यास गेल्यावर त्याने आपले लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दिनेश यादव यांनी दिली.

या संदर्भातील माहिती पीडित महिलेने वृत्तवाहिनीच्या प्रमुखाला दिली, त्या वेळी त्यांनी तक्रार न करण्याचा सल्ला दिला. आता ही महिला या वृत्तवाहिनीतून बाहेर पडली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पीडित महिलेने 10 दिवसांनी पोलिस अधीक्षक धर्मेंद्र सिंग यांच्याकडे तक्रार दिली होता. आता हे प्रकरण यादव यांच्याकडे आले आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर गुरुवारी रात्री नारायणसाईविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीडित महिलेने या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रेही पोलिसांना दिली आहेत.

Web Title: Narayanasai oppose complaint of sexual abuse