esakal | लव्ह जिहाद बरोबर 'ते' नार्कोटिक्स जिहादही करतात - ख्रिश्चन धर्मगुरुंचं वादग्रस्त वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala bishop

लव्ह जिहाद बरोबर 'ते' नार्कोटिक्स जिहादही करतात - ख्रिश्चन धर्मगुरु

sakal_logo
By
सुधीर काकडे

'लव्ह जिहाद' (Love Jihad) आणि 'नार्कोटिक जिहाद' (Narcotics Jihad) सारखे पर्याय वापरून अतिरेकी "बिगर मुस्लिमांना संपवण्याचा" प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केरळमधील कॅथलिक बिशपने (Catholic Bishop Joseph Kallarangatt) केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिरो मालबार चर्चेचे पाला बिशोप जोसेफ कल्लरंगट यांनी आरोप केला की, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय तरुणांचे धर्मांतर करण्यासाठी जिहादी लोक आता वेगळ्या पर्यायांचा वापर करत आहेत.

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगड येथील चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करताना बिशप जोसेफ यांनी हे विधान केले. “कट्टरतावाद्यांना समजले आहे की, भारतासारख्या देशात शस्त्र हातात घेऊन इतरांना संपवण सोपं नाही. त्यामुळे ते दुसरे पर्याय वापरत आहेत. त्यांच्या धर्माचा प्रचार करणे आणि बिगर मुस्लिमांना संपवणे हाच त्यांचा उद्देश आहे. ते 'लव्ह जिहाद' आणि 'नार्कोटिक जिहाद' या नव्या मार्गांचा वापर करतात." असे वक्तव्य बिशप कल्लरंगट यांनी केले. पुढे बोलताना बिशप असेही म्हणाले की, इतर धर्मांना संपवण्यासाठी कट्टरतावादी राज्यात जातीयवादाची आणि असहिष्णुतेची बीजं पेरण्याचं काम करत आहेत. इतर धर्मातील महिलांना ते आर्थिक अमिष दाखवत, लव्ह जिहादचा वापर युद्धनिती सारखा करतात.

हेही वाचा: VIDEO : आसाम बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू, दोन बेपत्ता

"प्रेम आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून जिहादी इतर धर्मातील महिलांचा गैरवापर, दहशतवादी कारवायांसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी वापर करतात असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. एवढ्यावरच न थांबता पुढे त्यांनी ''लव्ह जिहाद' नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे अज्ञानी आहेत कारण हे फक्त प्रेमविवाह नाही, ही एक युद्धनीती असल्याचे सांगितले. बिशप कलरंगट्ट यांनी यापुर्वी देखील अशी विधानं केली आहेत. गेल्या महिन्यात तरुण ख्रिश्चन मुलींना प्रेमात अडकवून त्यांना धर्म बदलण्यास सांगितले जाते. यासाठी विविध गटांकडून षडयंत्र केले जाते आहे असे म्हणत त्यांनी इशारा दिला होता.

loading image
go to top