काँग्रेस पक्ष बुडालेले जहाज- नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

पंतप्रधान मोदींचे जालंधरमधील सभेत टीकास्त्र

चंडीगड : देशातील काँग्रेस पक्षाची अवस्था बुडालेल्या जहाजासारखी झाली असून, ज्या लोकांनी येथील तरुणांना देशात आणि जगात बदनाम केले, त्यांना प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. केवळ सत्तेचे राजकारण केल्याने काँग्रेस पक्षावर आज ही अवस्था ओढवली आहे. या बुडणाऱ्या जहाजातून पंजाबला किनारा गाठता येणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत केली.

पंजाब राज्य हे शूरवीरांचा त्याग आणि शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाते; पण आज काही मंडळी वैयक्तिक स्वार्थासाठी राज्याला बदनाम करत आहेत. राजकारण खरंच इतक्‍या खालच्या थराला जाऊ शकतं का? असा सवाल करताना पंतप्रधान मोदी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काही पक्षबदलू लोकांसाठी निवडणूक हा उत्सव असतो, बादल साहेबांनी कधी पक्ष बदलला नाही किंवा हृदयही बदलले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले
- बादल यांच्या तपस्येमुळे पुन्हा त्यांचे सरकार येईल
- सत्तेच्या हावरटपणामुळेच काँग्रेस पिसाळली आहे
- पंजाबच्या हक्काचे पाणी पाकिस्तानातून आणू
- विकास हाच सर्व समस्यांवरील उपाय
- प्रकाशसिंग बादल यांचे बोट धरूनच चालायला शिकलो

Web Title: narendra modi attack on congress