पंतप्रधान मोदी आज बडोद्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

अहमदाबाद - भारतीय लष्कराच्या पाकव्याप्त काश्‍मीरमधील लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. 22) गुजरात भेटीवर येत असून, त्यांच्या हस्ते नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‌घाटन होणार आहे.

मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बडोद्यातील अत्याधुनिक विमानतळाच्या उभारणीसाठी तब्बल 160 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, विमानतळाच्या नामांतरावरून नवा संघर्ष पेटला असून, भाजपने या विमानतळास दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी केली असून, स्थानिकांनी मात्र त्यास सयाजीराव गायकवाड यांचे नाव द्यावे, अशी सूचना केली आहे.

Web Title: narendra modi in badoda