PM Narendra Modi Birthday
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रभावी वक्तृत्व आणि कणखर राजकीय नेतृत्व यासाठी नरेंद्र मोदी ओळखले जातात. पण पंतप्रधान मोदी हे केवळ एक राजकीय नेते किंवा वक्ते नाहीत, तर ते एक संवेदनशील लेखक आणि कवी देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांमध्ये सामाजिक, पर्यावरण आणि शैक्षणिक मुद्द्यांवर लेखन करण्यात आलं आहे. त्यांच्या या पुस्तकांविषयी जाणून घेऊया.