वाराणसीमधील मोदींचा रोड-शो 'सुपरहिट'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

वाराणसी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या लोकसभा मतदारसंघात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आयोजित 'रोड शो'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बनारस हिंदू विद्यापीठातून या रोड शोला सुरवात झाली. या वेळी दिलेल्या ''सुबहा बनारस, श्‍याम बनारस, मोदी तेरा नाम बनारस'' या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, मुख्यमंत्री अखिलेश यादव व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीतही शहरात रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी बसप्रमुख मायावतींच्या सभा झाल्या. 

पोस्टर हटविल्याचा भाजपचा आरोप 
निवडणूक कायद्याची अंमलबजावणीचे कारण देत प्रशासनाने विविध ठिकाणी लावलेली पोस्टर जाणीवपूर्वक हटविल्याचा आरोप भाजपने केला आहे. इतर ठिकाणी समाजवादी व काँग्रेस पक्षाची पोस्टर झळकत असताना मात्र भाजपची पोस्टर काढण्यात आल्याचे भाजप सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, ही कारवाई करताना कोणताही पक्षपातीपणा झाला नसून, भाजपने केलेला आरोप निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

भाजप पदाधिकारी व वृत्तपत्रावर गुन्हे दाखल करा 
नवी दिल्ली :
 नियंत्रण समितीची पूर्वपरवानगी न देता वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीप्रकरणी मणिपूरमधील भाजपचे संबंधित पदाधिकारी व आठ वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने आज दिले आहेत.

आज मणिपूर विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून, काल (ता. 3) काही वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. याची दखल घेत आयोगाने राज्य निवडणूक प्रमुखांना याबाबत आदेश दिले. त्यानुसार, सांगाई एक्‍स्प्रेस, पोकनाफम, मणिपुरी, पीपल्स क्रॉनिकल्स, नहारोल्गी, थाऊदांग, इंफाळ फ्री प्रेस व इतर वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल होतील.

Web Title: Narendra Modi UP election Varanasi Modi road show