

PM Narendra Modi
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या (पेपर लीक) घटनांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, यात सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी 'फास्ट-ट्रॅक' न्यायालये स्थापन केली जातील. तसेच, त्यांनी संबंधित विभागांना यासंदर्भात आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.