Narendra Modi: नरेंद्र मोदी हे देवाचा आवतार, हवं तोपर्यंत PM राहीतील; UP सरकारच्या मंत्र्याचे वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi: नरेंद्र मोदी हे देवाचा आवतार, हवं तोपर्यंत PM राहीतील; UP सरकारच्या मंत्र्याचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी यांनी केले आहे, ते देवाचा आवतार असल्याने हवे तोपर्यंत पंतप्रधान राहू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात अल्पसंख्याक व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवण्याबद्दल काही नेते बोलत आहेत याबद्दल विचारले असता, गुलाब देवी म्हणाल्या की, ही लोकशाही आहे, इथे कोणीही काहीही वक्तव्य करू शकतो, कोणतेही बंधन नाही. आम्ही याला फारसे महत्त्व देत नाही आणि पंतप्रधान (नरेंद्र) मोदीजी अवताराच्या रूपात आहेत, ते विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्ती आहेत, त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्यांची इच्छा असल्यास, जोपर्यंत त्यांचे आयुष्य आहे तोपर्यंत ते पंतप्रधान राहतील.

हेही वाचा: Video : तुम्ही काय 'ऑस्कर' देणार का? 'झलक दिखला जा'वरून करण जोहरवर भडकली शिल्पा

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की म्हणाले की, या चर्चांमुळे ते (मोदी) पंतप्रधानपदावरून हटणार नाहीत किंवा दुसरी व्यक्ती येणार नाही, ते एक विलक्षण व्यक्ती आहेत. पुढे बोलताना या मंत्री म्हणाल्या की, मी म्हणते की ते देवाचे अवतार आहेत, देवाने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून येथे पाठवले आहे. हवं तेव्हा ते लोकांकडून काहीही करून घेतात, वाटलं तर घंटा वाजवून घेतात, . त्यांना जे हवं ते ते करवून घेतात, असे त्यांनी म्हटले आहे. देवी या सांभल जिल्ह्यातील चांदौसी या मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत.

हेही वाचा: Nothing ने भारतात लॉंच केले 29 तासांपर्यंत चालणारे पारदर्शक इअरबड्स; 'इतकी' असेल किंमत