Nothing ने भारतात लॉंच केले 29 तासांपर्यंत चालणारे पारदर्शक इअरबड्स; 'इतकी' असेल किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nothing ने भारतात लॉंच केले 29 तासांपर्यंत चालणारे पारदर्शक इअरबड्स; 'इतकी' असेल किंमत

Nothing ने भारतात लॉंच केले 29 तासांपर्यंत चालणारे पारदर्शक इअरबड्स; 'इतकी' असेल किंमत

Nothing ने नथिंग इअर स्टिक (Nothing Ear Stick) हे नवीन इयरबड्स भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. या इयरबड्सची भारतात किंमत 8499 रुपये असून कंपनीचा दावा आहे की नथिंगचे हे लेटेस्ट वायरलेस इयरबड्स एका चार्जवर 7 तासांपर्यंत बॅटरीचे लाइफ देतील. त्याच वेळी, कंपनीने असेही म्हटले आहे की चार्जिंग केससह, 29 तासांपर्यंत एकूण बॅटरी लाइफ मिळेल. नथिंग इयर स्टिकची विक्री4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने या इयरबड्ससाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे.

डिझाईन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नथिंग इअर स्टिक एका नवीन उभ्या केससह येते. केस USB-C चार्जिंग पोर्टसह येते, याला वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिलेला नाही.तुलनेत, नथिंग इअर 1 ला स्क्वेरिश केस मिळते, जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. यात पारदर्शक झाकण आहे, त्यामुळे तुम्ही ते न उघडता पाहू शकता.

इअरबड्सबद्दल बोलायचे झास्यास, नवीन इअर स्टिकमध्ये 12.6mm डायनॅमिक ड्रायव्हर, AAC आणि SBC कोडेक्ससाठी सपोर्ट आणि स्टेम डिझाइनसह नथिंग सिग्नेचर ट्रान्सपरंट डिझाइन आहे. कंपनीचा दावा आहे की केवळ इअरबड्स 7 तासांपर्यंत लिस्निग टाईम देतात आणि पूर्ण चार्ज केल्यावर 3 तासांपर्यंत कॉलिंग टाइम देतात, तर केस 29 तासांपर्यंत एकूण बॅटरी लाइफसह येते. दुसरीकडे इअर 1 मध्ये सिलिकॉन-टिप्ड इयरबड्स आहेत आणि ते ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) सह येतात, जे इअर स्टिक मध्ये देण्यात आलेले नाही.

इयरबड्स IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स, इन-इअर डिटेक्शन आणि Google फास्ट पेअर तसेच मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट पेअरसाठी सपोर्टसह देखील येतात. हे ब्लूटूथ 5.2 ला सपोर्ट देतात आणि Android 5.1 आणि त्यानंतरचे व्हर्जन तसेच iOS 11 आणि त्यानंतरच्या व्हर्जन्सवर देखील काम करेल.

हेही वाचा: Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

Nothing X App

नथिंगने नथिंग एक्स अॅप देखील सादर केले जे वापरकर्ते इअर स्टिकचे साऊंड आउटपुट कस्टमाईज करण्यासाठी तसेच जेश्चर कॉन्फिगर करण्यासाठी वापरू शकतात. हे अॅप प्रामुख्याने अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे नथिंग फोन 1 वापरत नाहीत आणि विशेष म्हणजे हे अॅप वापरकर्त्यांना इअरबड हरवल्यावर ते शोधण्यात मदत करते.

फोन 1 वर गेमिंग करताना लेटंन्सी कमी करण्यासाठी लो-लॅग मोड आपोआप सुरू होतो. Nothing Phone 1 वापरकर्त्यांना काही अधिक विशेष फीचर्स देखील मिळतील, ज्यात कस्टम इक्वलायझर जेश्चर, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि Nothing X ऍप्लिकेशनच्या सर्व क्षमतांचा समावेश आहे.

हेही वाचा: Meta Fined: मेटाला मोठा दणका! स्पर्धा कायदा मोडल्याप्रकरणी बसला 153 कोटींचा दंड

किंमत आणि उपलब्धता

नथिंग इयर स्टिकची किंमत 8,499 रुपये आहे आणि 17 नोव्हेंबरपासून मिंत्रा आणि फ्लिपकार्टवर ओपन सेलच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. उल्लेखनीय म्हणजे, नथिंग इयर 1 ची सध्या फ्लिपकार्टवर किंमत 7,299 रुपये (व्हाइट व्हेरिएंट) आणि 8,499 रुपये (ब्लॅक व्हेरिएंट) आहे.

टॅग्स :Technology