नरेंद्र मोदींना 'सलाम'- केजरीवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विविध मुद्यांवर मतभेद असले तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक‘ला परवानगी दिल्याबद्दल मोदींना ‘सलाम‘ करतो, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले, पंतप्रधानांबरोबर विविध मुंद्यांवर मतभेद आहेत. परंतु, त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे त्यांना सलाम करतो. दहशतवादी लढ्यासाठी मोदींना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.‘

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 11 दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी (ता. 28) मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

Web Title: Narendra Modi, Kejriwal salama