पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी दिवाळी जवानांसोबत साजरी करणार आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना, मोदींनी जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडच्या माणामधील बद्रिनाथ मंदिराजवळ भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) साथीने पंतप्रधान दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवालही असणार आहेत. 

मोदींच्या या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाही. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी सियाचीनमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. मोदींनी दिवाळीनिमित्त जवानांना संदेश पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: Narendra Modi Likely to Spend Diwali on Indo-Tibetan Border with ITBP Jawans