देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभऱातून अभिवादन

वृत्तसंस्था
बुधवार, 25 डिसेंबर 2019

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त देशभऱात विविध उपक्रम घेतले जात आहेत.

दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त देशभऱात विविध उपक्रम घेतले जात आहेत.

सदैव अटल या त्यांच्या समाधिस्थळी जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, मंत्री हर्षवर्धन यांनी अभिवादन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊ येथे उभारलेल्या 25 फुटी अष्ठधातूच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. हा पुतळा अटलजींचा सर्वात मोठा पुतळा असणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन देखील केले जाणार आहे.

'मोदी आणि शहांची विधाने परस्परविरोधी'

पंतप्रधान या कार्यक्रमासाठी एक तास लखनऊमध्ये असणार आहेत. अटलजी यांचे देशाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. अटलजींचे निधन 16 आॅगस्ट 2018 रोजी झाले होते. जयपुरमध्ये देखील अटलजी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या सांस्कृतिक विभागाने अटलजी यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे्. या अगोदर 23 डिंसेबरला 51 कविताए असा कार्यक्रम झाला. आज अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra modi in lucknow unveil 25 ft vajpayee statue atal bihari medical university