
PM मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर राहणार चिनची नजर; कारण...
नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर १६ मे रोजी नेपाळला (Nepal) भेट देणार आहेत. नेपाळ सरकार देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चिनी कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. यासंदर्भात दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा होणार आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींचा नेपाळ दौरा चीनकडून (china) स्वीकारला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Narendra Modi on Nepal tour)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते चीन (china) सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्यासपीठ सामायिक करतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळ सरकार आपले महत्त्वाचे प्रकल्प चिनी कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्यांना देण्याचा विचार करीत आहे. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पाचव्यांदा नेपाळला भेट देणार आहेत.
हेही वाचा: ‘मला संबंध ठेवायला आवडत नाहीत’; पहिल्याच दिवशी पत्नीने केले स्पष्ट
सेती जलविद्युत प्रकल्पासाठी भारतासोबत चर्चा सुरू असल्याचे नेपाळचे (Nepal) पंतप्रधान देऊबा यांनी सांगितले. नेपाळने २०१२ आणि २०१७ मध्ये याच प्रकल्पासाठी चिनी (china) कंपन्यांसोबत करार केला होता. यामुळे पंतप्रधान मोदींचा नेपाळ दौरा चीनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. चीनच्या नजरा मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर असतील.
बुद्ध जयंती कार्यक्रमाला संबोधित करणार
यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेपाळमधील मुक्कामादरम्यान गौतम बुद्धांचे आवडते ठिकाण लुंबिनीलाही भेट देणार आहेत. लुंबिनीमध्ये पंतप्रधान पवित्र मायादेवी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहेत. नेपाळ सरकारच्या नेतृत्वाखाली लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमालाही पंतप्रधान संबोधित करतील.
हेही वाचा: खंजीर खुपसल्याची भाषा करणाऱ्या पटोलेंना पाटलांनी दिला मोलाचा सल्ला
द्विपक्षीय बैठकीतही होणार सहभागी
लुंबिनी मठ परिसरात इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC), नवी दिल्ली यांच्या मालकीच्या भूखंडामध्ये बौद्ध संस्कृती आणि वारशासाठी केंद्र उभारण्यासाठी पंतप्रधान स्वतंत्रपणे फाउंडेशन समारंभात भाग घेतील. याशिवाय दोन्ही देशांचे पंतप्रधान द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत.
Web Title: Narendra Modi On Nepal Tour China Buddha Purnima
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..