
खंजीर खुपसल्याची भाषा करणाऱ्या पटोलेंना पाटलांनी दिला मोलाचा सल्ला
नागपूर : भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शत्रुत्व हवे असेल तर आघाडीतून करावे. आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे खुले आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Jayant Patil) यांनी दिले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ‘स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही’ असे म्हणत नरमाईने घेण्याचा सल्ला दिला.
नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची करीत भाजपला सुरुंग लावला व भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले. या बंडखोरीमुळे व भंडाऱ्यासोबतच गोंदिया (gondia) येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदाराचा दावा
यानंतर नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या धोक्याची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे करणार असल्याचे म्हटले होते. बेईमानी आमच्या रक्तात नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती करीत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचेही नाना पटोले (nana patole) म्हणाले होते.
नाना पटोले हे पाठीत खंजीर खुपसला असे बोलत आहे. परंतु, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत व होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. हे लक्षात घ्यायला हवे. लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
हेही वाचा: विदर्भात कंडोमचा वापर वाढला; राष्ट्रीय सर्व्हेतून समोर आली बाब
प्रफुल्ल पटेल हे परदेशी
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस का एकत्रित जाऊ शकले नाहीत? याची सध्या आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल हे परदेशी गेले आहेत. परत आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
Web Title: Jayant Patil Nana Patole Important Advice National Congress Party Bhandara Gondia Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..