नदी दिन परंपरेशी सुसंगत : नरेंद्र मोदी

स्वच्छता हा फक्त सरकारी कार्यक्रम नाही
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीगुगल
Updated on

नवी दिल्ली : विश्व नदी दिन हा एक असा दिवस आहे की जो भारतीय परंपरांशी पूर्ण सुसंगत आहे. त्यामुळे देशवासीयांनी हा उत्सव अवश्य साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले.

या आकाशवाणी कार्यक्रमाच्या ८१व्या भागात बोलताना पंतप्रधानांनी मानवी जीवनात नद्यांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करताना संस्कृतीतील नद्यांचे स्थानही सांगितले. जागतिक नदी दिन हा भारताच्या शतकानुशतकांच्या परंपरांना जोडणारा किंबहुना त्याच्याशी सुसंगत असा दिवस आहे असे सांगून मोदी यांनी -“पिबन्ति नद्यः, स्वयमेव नाम्भः”, त्याचप्रमाणे अंघोळ करताना म्हणण्यात येणारा ''गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वति. नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ॥ हा श्लोक उद््धृत केला.

ते म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये नद्या या भौतिक वस्तू नाहीत तर त्या जीवनदायिनी, मातृस्वरूप आणि प्रत्यक्ष अस्तित्व असलेल्या आहेत. नदी आपले पाणी कधी स्वतः पीत नाहीतर परोपकारासाठी ते इतरांना देते. आमचे सण आणि उत्सव नद्यांच्या काठावरच साजरे होत आलेले आहेत.

नरेंद्र मोदी
दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा

ते पुढे म्हणाले की महात्मा गांधी यांनी स्वच्छता हे मूल्य स्वातंत्र्यसंग्रामाबरोबर जोडलेले होते. त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. आपल्याला ज्या छोट्या गोष्टी वाटतात त्या महात्मा गांधींच्या जीवनात मोठ्या महत्त्वाच्या होत्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी जोडून त्यांनी प्रचंड मोठमोठे संकल्प साकार केले होते. स्वच्छतेबरोबरच त्यांनी खादीही स्वातंत्र्य चळवळीशी जोडली होती. स्वच्छता केवळ सरकारी कार्यक्रम नाही तर तो नव्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा एक अविभाज्य भाग आहे. इतक्या दशकांनंतर आज पुन्हा स्वच्छता आंदोलनाने नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडले आहे.

खादी विक्रमासाठी आवाहन

यावर्षी गांधी जयंतीला म्हणजे दोन ऑक्टोबरला खादी खरेदीचा नवा विक्रम करून देशवासीयांनी खादीचे महत्त्व जगाला पटवून द्यावे असे आवाहनही मोदी यांनी केले. खादीचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या अमृतकाळामध्ये महात्मा गांधींच्या काळा प्रमाणेच आजच्या युवा पिढीतही खादी वापर करण्याचा कल वाढत असल्याचे पाहताना एक वेगळा आनंद मनाला मिळतो. खादी आणि हातमागाचे उत्पादन आज मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दिल्लीच्या खादी भांडार यामध्ये यापूर्वी एका दिवसात एक कोटी रुपयांची विक्रमी खादीविक्री झाली होती याची आठवण मोदींनी पुन्हा करून दिली. येत्या दोन ऑक्टोबरला देशवासीयांनी आपल्या गावात, शहरात, जिल्ह्यात जेथे खादी मिळते तेथे जाऊन त्यादिवशी अवश्य खरेदी करावी आणि खादी खरेदीचा नवा विक्रम करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com