PM मोदींच्या निवासस्थानी मोठी बैठक; सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा

Large meeting at PM Modis residence
Large meeting at PM Modis residenceLarge meeting at PM Modis residence

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात सरकार स्थापनेसाठी सुरू असलेल्या कसरती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ((Narendra Modi)) केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक घेत आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित होते. (Large meeting at PM Modis residence)

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश (uttar pradesh), उत्तराखंड, गोवा (goa) आणि मणिपूरमध्ये (manipur) भाजप पुन्हा सत्तेवर आला, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले. मणिपूरमध्ये भाजपने पुन्हा एकदा एन बिरेन सिंग यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Large meeting at PM Modis residence
वाटाघाटी हा एकमेव मार्ग; झेलेंस्कींचा रशियाला इशारा

सोमवारी उत्तराखंडमध्ये (uttarakhand) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. डेहराडून येथे होणाऱ्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय निरीक्षक म्हणून तर परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी सहनिरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमध्ये भाजपने सलग दोन निवडणुका जिंकून ऐतिहासिक यश मिळवले. मात्र, या डोंगराळ राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्यापही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खतिमा येथून निवडणूक हरले आहेत.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आणि गोव्यात प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री बनणे निश्चित मानले जात आहे. उत्तर प्रदेशात उपमुख्यमंत्री कोण होणार? हा पेच कायम आहे. कारण, केशव प्रसाद मौर्य यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. पुढील आठवड्यात पक्ष तीन राज्यांमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करेल, असे मानले जात आहे.

Large meeting at PM Modis residence
डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत योगींच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांना सरकार स्थापनेसाठी पक्षाचे निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकार स्थापनेबाबत अत्यंत सावध

उत्तर प्रदेश (uttar pradesh) विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाकडे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या उपांत्य फेरीतील विजय म्हणून पाहिले जात आहे. अशा स्थितीत पुढील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप उत्तर प्रदेश सरकार स्थापनेबाबत अत्यंत सावधपणे पुढे जात आहे.

शपथविधी कार्यक्रम २५ मार्च रोजी

उत्तर प्रदेशमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक नवीन सरकारच्या शपथ घेण्याच्या एक दिवस आधी २४ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी कार्यक्रम २५ मार्च रोजी लखनौमधील शहीद पथावरील एकना स्टेडियमवर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com