पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

Narendra Modi receives Seoul Peace Prize for 2018
Narendra Modi receives Seoul Peace Prize for 2018

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार आज (शुक्रवार) देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. मोदींना पुरस्कारासोबत 1 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार आहे, असे मोदींनी सांगितले. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मोदी म्हणाले, 'हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवले आहे, त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणे माझे भाग्य आहे.'

दरम्यान, सेऊलमध्ये मोदी गुरुवारी दाखल झाले आहेत. मे 2015 नंतर त्यांचा सेऊला हा दुसरा दौरा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com