
'अरुणाचल हमारा', PM मोदींनी सादर केलं भारतरत्न भूपेन हजारिकांचे गीत
अरुणाचल प्रदेश राज्याचा आ़ज राज्य स्थापना दिवस. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) ३६ व्या राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या प्रसंगी त्यांनी प्रसिद्ध भारतरत्न भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांचे ‘अरुणाचल हमारा’ हे प्रसिद्ध गीत सादर केले.
या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले,“मला ठाम विश्वास आहे की ईशान्य भारत 21 व्या शतकात देशाच्या विकासाचे इंजिन बनेल. आम्ही अरुणाचलला पूर्व आशियाचे (East Asia) प्रमुख मार्ग बनवण्यासाठी काम करत आहोत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत अरुणाचलची भूमिका पाहून आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.”
हेही वाचा: Punjab Election : शिरोमणी अकाली दल-भाजप युती होणार? मजेठियांनी केलं स्पष्ट
आझादीच्या अमृत महोत्सवात, देश अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सर्व हुतात्म्यांना स्मरण करतो, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. अँग्लो अबोर युद्ध असो किंवा स्वातंत्र्यानंतर सीमांचे रक्षण असो, अरुणाचल प्रदेशातील लोकांच्या शौर्याची गाथा प्रत्येक भारतीयासाठी अमूल्य वारसा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Web Title: Narendra Modi Recites A Few Lines From Arunachal Hamara Song
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..