

Narendra Modi Gamcha Style Video
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. पोहोचताच पंतप्रधान मोदींनी बिहारी शैलीत गमछा हाताने हलवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी प्रचारासाठी त्यांनी गमछा हाताने हलवला होता.