Narendra Modi Maharashtra Tour
Narendra Modi Maharashtra TourESakal

Narendra Modi Tweet: वाढवण बंदराचे उद्घाटन; महाराष्ट्र दौऱ्याआधी मोदींचे ट्विट चर्चेत, काय म्हणाले?

PM Modi's Tweet Before Maharashtra Tour in Discussion: आज नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे उद्घाटन आहे. याआधी त्यांनी एक ट्विट केले आहे.
Published on

PM Modi On Vadhvan Port: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे. यावेळी ते वाढवण बंदराचे उद्घाटन करणार करणार आहेत. मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 'वाढवण बंदर प्रकल्प' हा एक "अतिशय विशेष प्रकल्प" असल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प भारताच्या विकासात योगदान देईल असे सांगितले. हा प्रकल्प महाराष्ट्राला "प्रगतीचे पॉवरहाऊस" म्हणून दुजोरा देईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com