Narendra Modi : ‘गोंधळी’ खासदारांनी आत्मनिरीक्षण करावे

संसदेत लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी येणाऱ्या काळात आत्मनिरीक्षण करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी खासदारांना दिला.
narendra Modi
narendra Modisakal

संसदेत लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी येणाऱ्या काळात आत्मनिरीक्षण करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी खासदारांना दिला. अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संवादाची सुरुवात आणि शेवट मोदी यांनी ‘राम राम’ ने केला.

स्वभावाने गोंधळी असलेल्या खासदारांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, मागील दहा वर्षांच्या काळात ज्याला जो मार्ग सुचला, त्याने त्या प्रकारे संसदेत काम केले आहे. गोंधळी खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन लोकांना खासदाराचे नाव विचारावे. लोकांना ते नाव माहिती नसेल.

पण जे खासदार सकारात्मक पद्धतीने काम करत आहेत, त्यांचे नाव लोकांच्या बरोबर लक्षात असते. अर्थसंकल्पी अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. विरोधकांसाठी हे अधिवेशन पश्चातापाचे अधिवेशन आहे. विरोधी खासदार आत्मपरिक्षण करतील, अशी आपणास आशा आहे.

केंद्रात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर ते सरकार संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. येणारा पूर्ण अर्थसंकल्प देखील आम्हीच सादर करू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. नवीन संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अधिवेशनावेळी ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर करण्यात आले होते.

महिला शक्तीचे शौर्य, पराक्रम आणि संकल्प हे मागील काळात देशवासीयांनी पाहिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत असलेला अर्थसंकल्प हे एक प्रकारे महिला शक्तीचा अनुभव घेण्याचे पर्व आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com