

Dimaagi Naxal Remark by Narendra Modi Sparks Political Discussion Over His Sharp Attack and Strong Political Statement
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना विचार करणाऱ्या युवकांसाठी ‘दिमागी नक्षल’ हा नवा शब्द वापरला. काही वेळातच ‘दिमागी नक्षल पार्टी’ सुरू होऊन त्याला एका दिवसात अडीच लाख लोकांनी पाठिंबा दाखविला अन् मोदींना घरचा आहेर दिला.
मोदींच्या शब्दांचा अर्थ काय घ्यायचा? ‘दिमागी नक्षल’ म्हणजे ज्यांना डोकं आहे, असे विचारी लोक. त्यात युवक, युवती, स्वतंत्र विचार करून सरकारला प्रश्न विचारणारे लोक यांचा समावेश आहे. अर्थात, त्यांचा रोख कॉक्रोच जनता पक्ष व त्याला पाठिंबा देणारी तरूण पिढी याकडे आहे, यात शंका नाही.