PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

PM Modi Nomination: यानंतर आज दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एनडीएतील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
PM Narendra Modi Files Nomination From Varanasi
PM Narendra Modi Files Nomination From VaranasiEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आज दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज गंगा सप्तमी आणि नक्षत्रराज पुष्य असा योगायोग आहे. या रवियोगाने ग्रहांची चांगली स्थिती निर्माण होत आहे. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही काम केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात. पुष्य नक्षत्रात कोणतेही काम केल्यास त्याची पूर्णता निश्चित मानली जाते. या विशेष योगायोगानेच पंतप्रधान मोदींनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे. (PM Modi Nomination In Varanasi)

PM Narendra Modi Files Nomination From Varanasi
रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वाराणसी येथील काशी कोतवाल बाबा काल भैरव मंदिरात पूजा केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 12 राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.

PM Narendra Modi Files Nomination From Varanasi
Video Viral: लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली; व्हिडिओ होतोय व्हायरल...

लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीत 1 जून रोजी शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये येथून निवडणूक लढवली होती.

पंतप्रधानांनी 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, तेव्हा येथून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत मोदींनी केजरीवाल यांच्या तब्बल 3 लाख 71 हजार मतांनी विजय मिळवला होता.

तर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींचा विजय आणखी मोठा होता. त्यावेळी पंतप्रधानांनी समाजवादी पक्षाच्या शालीनी यादव यांचा 4 लाख 80 हजार मतांनी विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com