2024 नंतर मोदींची गच्छंती फिक्स; लालूंना 100 टक्के विश्वास

2024 नंतर मोदींची गच्छंती फिक्स; लालूंना 100 टक्के विश्वास
Updated on

पाटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आता पुन्हा एकदा आपल्या आधीच्या आक्रमक पवित्र्यात परतताना दिसून येत आहेत. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हळहळू ते राजकारणात सक्रिय होत आहेत. सध्या बिहारमधील काही मतदारसंघात सुरु असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रचार देखील केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींची गच्छंती होईल, असा ठाम दावा लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. क्विंट हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मोदींच्या सत्तेला जनता कंटाळली असल्याचं म्हटलंय. देशात सध्या महागाई आणि बेरोजगारी शिखरावर असून जनता त्रस्त झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, पुढचा पंतप्रधान कोण असेल, याचं उत्तर देताना मात्र लालूंनी म्हटलंय की, हे एकत्र बसून ठरवलं जाईल.

2024 नंतर मोदींची गच्छंती फिक्स; लालूंना 100 टक्के विश्वास
अखेर 'मन्नत' पूर्ण, आर्यन खान तुरुंगातून सुटला

राहुल गांधींबाबत काय म्हणाले लालू प्रसाद यादव?

लालू यादव यांनी राहुल गांधींबाबत देखील मते मांडली आहेत. पुढचे पंतप्रधान ते असू शकतील का? ते 'पीएम मटेरिअल' आहेत का? या प्रश्नावर त्यांनी म्हटलंय की, कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन काही होणार नाहीये. मी म्हटलंय की, समान विचारधारेचे सगळे पक्ष एकत्र येऊन यूपीएमधील नेते ठरवतील की काय करायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत की नाही? या प्रश्नावर लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय की, हे काँग्रेसवाल्यांनी सांगावं, मी कसं सांगू शकणार?

उद्योगपतींच्या इशाऱ्यावर नाचतंय सरकार

लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय की, सरकार सगळं काही खासगी करुन टाकत आहे. जे कुणी उद्योगपती आहेत अशांना सगळं काही सोपवत आहे. रेल्वेचं खासगीकरण केलं. रेल्वेमध्ये चादर देखील मिळत नाहीये. यासाठी आता घरातूनच तुम्ही तुमची चादर, जेवण घेऊन जात जा आणि प्रवास करा. सरकारने सगळं काही नष्ट करुन टाकलंय.

2024 नंतर मोदींची गच्छंती फिक्स; लालूंना 100 टक्के विश्वास
शाहरुख मला तुझा अभिमान वाटतो, उर्मिला मातोंडकर

माझं नाव ऐकूनच चार्ज होतात लोक

लालू यांनी साडेतीन वर्षांनंतर पाटनामध्ये परतल्याचा आनंद व्यक्त केला आणि म्हटलं की, आता वाटतंय की मी घरातच आहे. माझ्यासोबत लोकांनी अन्याय केला, मला त्रास दिला. मी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकांना हजर राहू शकलो नाही. आता या पोटनिवडणुकीत संधी मिळाली तर मी आलो. यावेळी जनताच यांना त्यांची लायकी दाखवून देईल. सहा वर्षांनंतर प्रचार सभा केल्यानंतर लालू यांनी म्हटलंय की, आता त्यांना असं जाणवतंय की ते आपल्या घरी आले आहेत. लोक माझं नावच ऐकूनच चार्ज होतात. लोकांना मला ऐकायला आणि पाहायला आवडतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com