न्यू इंडियाच्या संकल्पनेनं देश प्रगतिपथावर न्यायचा आहे: मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, काश्मीर वाद, भारत-चीन समस्या, धर्माच्या नावावर होत असलेली हिंसा, तिहेरी तलाख आणि गोरखपूरमध्ये घडलेल्या दुर्घटनेबद्दल भाष्य करताना भारत जोडोचा नारा दिला. तसेच त्यांनी न्यू इंडियाच्या संकल्पनेनं देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे असे आवाहन केले. 

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले :

  • काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहील 
  • तीन वर्षांत सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा शोधण्यात आला आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले
  • आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय
  • गरिबांना लुटून तिजोरी भरणाऱ्यांना आजही सुखाची झोप येत नाही
  • बराच काळ मुख्यमंत्री राहिल्याने देशातील विकासात राज्यांचे महत्त्व माहिती आहे
  • तरुणांना नोकऱ्या मिळतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल
  • गोळ्या किंवा शिव्यांनी नव्हे, तर काश्मिरींच्या गळाभेटीनेच जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन होईल
  • दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत
  • जम्मू-काश्मीरचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे
  • जीएसटीमुळे व्यापार क्षेत्र मजबूत झाले
  • गोरखपूरमधील मुलांच्या मृत्यूप्रकरणी दुःख आहे
  • प्रत्येक गावागावात वीज पोहोचवली आहे, देश प्रगती करतोय
  • जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले, त्यावेळी भारताची ताकद जगाला मान्य करावी लागली
  • देशातील अंतर्गत सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे
  • चालतंय ते चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, परिस्थिती बदलतेय
  • नैराश्याला मागे टाकून आत्मविश्वासानं देशाची प्रगती साधायची आहे
  • तरुणांना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे भाग्य मिळत आहे, तरुणांना देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचे मी आवाहन करतो
  • 21व्या शतकात जन्मलेल्या तरुणांसाठी हे वर्षं महत्त्वपूर्ण आहे
  • सुदर्शन चक्रधारी मोहनपासून चरखाधारी मोहन करमचंद गांधींपर्यंत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे
  • देशातील सामूहिक शक्तीच्या साहाय्यानं परिवर्तन आणणे शक्य
  • देशाच्या मागे सामूहिक शक्तीची ताकद आहे
  • देशातला बराच भाग आज नैसर्गिक आपत्तीशी लढतोय
  • चांगला पाऊस देशातील पिके फुलवण्यासाठी मदत करतो
  • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाकडे पक्के घर आणि वीज असेल
  • प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या यापूर्वी 22 लाख होती, आता ती 56 लाख झाली आहे
  • देशाच्या स्वातंत्र्य, गौरवासाठी ज्यांनी बलिदान दिले, अशा महानुभावांना शतशः नमन करतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com