Chandrayaan2 : 'नासा'लाही नाही सापडला विक्रम...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 September 2019

चंद्राभोवती फिरणाऱ्या 'एलआरओ कॅमेरा'च्या साहाय्याने हे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु चंद्राच्या दक्षिण भागावर अंधार पडत चालल्यामुळे हे छायाचित्र घेणे शक्य झाले नसल्याचे नासाने म्हटले आहे.

पुणे : अमेरिकी अवकाश संशोधन संस्था 'नासा'ला इस्रोच्या चांद्रयानाचे लँडर 'विक्रम'चा शोध घेण्यास अपयश आले आहे. मंगळवारी (ता. 17) चंद्राभोवती फिरणाऱ्या 'एलआरओ कॅमेरा'च्या साहाय्याने हे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु चंद्राच्या दक्षिण भागावर अंधार पडत चालल्यामुळे हे छायाचित्र घेणे शक्य झाले नसल्याचे नासाने म्हटले आहे.

Chandrayaan 2 : असे भटकले विक्रम लँडर चंद्रापासून

नासा म्हणते,"दोन आठवड्यांच्या चांद्रदिवसांनंतर तेथे आता रात्र होत आहे. दक्षिण ध्रुवावर सध्या तिन्हीसांज झाली आहे. त्यामुळे 'एलआरओसी'ला छायाचित्र घेता आले नाही." या प्रकल्पात काम करणारे ऍरिझोना विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क रॉबिन्सन म्हणाले,"नासाच्या नियमानुसार काही दिवसातच ही संपूर्ण माहिती लोकांसाठी उपलब्ध होईल. तसेच विक्रम ज्या परिसरात आहे तेथील छायाचित्रे 'इस्रो'ला देण्यात येतील. त्यातून अधिक विश्लेषणासाठी भारताला मदत होईल." प्रकाशाचा अभाव आणि छायाचित्र घेण्यासाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे हा प्रयत्न फसल्याचे नासाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nasa also cannot search Vikram on moon